Subscribe Us

header ads

पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथील मयत मुलीच्या आईच्या तक्रारी वरुण एकावर गुन्हा दाखल .

पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथील मयत मुलीच्या आईच्या तक्रारी वरुण एकाजणावर गुन्हा दाखल .



(पाटोदा प्रतिनिधी) दि.०७ पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह घरात गळाफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणात मुलीच्या पित्याने पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की. घरातील सर्वजण बाहेरगावी लग्नासाठी गेले होते गुरुवारी सांयकाळी घरी परतल्यानंतर मुलगी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. गावातील एका तरुणाकडून मयत मुलीसह तिच्या बहिणीची वारंवार छेड काढली जात होती. यापूर्वी त्या तरुणाने अश्लील चाळे केल्याने गावातील नागरिकांनी त्याला समज दिली होती. त्यानंतर तो तरुण मुलीला जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. दि.५आँगष्ट रोजी आम्ही लग्नासाठी बाहेरगावी गेल्याने घरात मुलगी एकटी असल्याचे पाहुन त्याच तरुणाने मुलीवर अत्याचार करून तिला फासावर लटकवले असावे असा संशय मुलीच्या वडीलांनी पोलीसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. या प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधित तरुणाविरुध्द कारवाई करावी अशी मागणीही मुलीच्या पित्याने तक्रार केली आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य पाहाता मुलींचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई च्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते.दि.6 ऑगस्ट रोजी मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार देत.आगोदर कारवाई करा अशी भूमिका घेतली होती.त्यावेळी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून उमेश अश्रू क्षीरसागर वय ३० वर्ष याच्या विरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गु.र.न.१४७ /२१ कलम ३०५, ३५४ अ, भा.द.वि सह कलम बाललैगीक अत्याचार अदी नियम २१२ चे कलम २०१२ प्रमाणे गुन्हा नोदविण्यात आला असून सहायक पोलीस उपनिरीक्षक सानप मँडम पुढील तपास करीत आहे.
त्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतले व चुंबळी येथे सांयकाळी साडे आठच्या सुमारास शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आले.अशा संतापजनक घटनांमुळे सर्व
सामन्यानतुनही निषेध व्यक्त होत असून बलात्काऱ्यां फासावर लटकावावे अशी मागणी होऊ लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक