Subscribe Us

header ads

पालवण येथील रावसाहेब आण्णा उगले यांचे दुःखद निधन


जुन्या पिढीतील ट्रक व्यावसायिक म्हणून जिल्हाभर ख्याती मिळवली होती


बीड प्रतिनिधी-  शिवसेना युवानेते तथा समाजसेवक गणेश उगले यांचे चुलते तर शिवसेना माजलगाव तालुका उपप्रमुख अतुल उगले व युवानेते सुहास उगले यांचे वडील श्री रावसाहेब गणपतराव उगले वय 80 वर्ष राहणार पालवण तालुका जिल्हा बीड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9*30 वाजता दुःखद निधन झाले. ते जुन्या पिढीतील ट्रक मालक आणि ट्रक व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध होते. ट्रक व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी मुंबई येथे दहा वर्ष वास्तव्य केले होते.अत्यंत मनमिळाऊ रुबाबदार आणि कडवे व्यक्तिमत्त्व म्हणून संपुर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या दरम्यान त्यांच्यावर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजीमंत्री बदामरावजी आबा पंडित, माजी आमदार सुनीलदादा धांडे सर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसंग्रामचे नेते बाळासाहेब जटाळ, शिवसेना शहरप्रमुख सुनील सुरवसे, नगरसेवक रमेश चव्हाण, नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्रीराम बहीर सर, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष हरिदास घोगरे सर, आजिनाथ भांडवले, मा. नगरसेवक सय्यद मुस्तफा, उद्योजक मिलन मस्के, शिक्षकनेते अर्जुन बहीर सर, नारायण खराडे सर, बंडू काळे सर, राजेंद्रदादा मस्के, गणेश तोडेकर, बद्रीनाथ जटाळ,आप्पाराव दादा उगले, अखिल भारतीय मराठा महासंघाचे भागवत मस्के,छावाचे जिल्हाध्यक्ष युवराज मस्के,रामप्रभु मस्के,नवनाथ उगले, गोविंद परजणे, बळीराम उगले, भगवान मस्के, विकास मस्के यांच्यासह गावातील नागरिक, नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होते.स्वर्गीय रावसाहेब  उगले यांचा बीड जिल्हा तसेच मुंबई, धुळे, औरंगाबाद, माजलगाव येथे फार मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्या निधनाने पालवण व पंचक्रोशी सह त्यांच्या खालापुरी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या वतनाच्या गावी व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुले-वरत, अतुल, सुहास,व्यंकट मुलगी- मंगल ही विवाहीत मुले,मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा सावडण्याचा विधी पालवण ता. बीड येथे दिनांक 25  आॅगस्ट रोजी सकाळी 8 वाजता तर दशक्रिया विधी 2 सप्टेंबर रोजी श्री शेत्र राक्षसभवन शनीचे या.गेवराई जि.बीड येथे सकाळी 11 वाजता होईल असे उगले कुटुंबियांच्या वतीने गणेश उगले यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा