Subscribe Us

header ads

अंबाजोगाई वीटभट्टी चालकाचा मृतदेह आढळला!



(अंबाजोगाई प्रतिनिधी) मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वीट भट्टी चालकाचा मृतदेह विचित्र अवस्थेत मिळून आला ही घटना तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथील दूरदर्शन केंद्राजवळ असलेल्या वरवटी पिंपळा शिवारात घडली फारुख  लतीफ मोमीन वय (46) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. नातेवाईकांनी हा घातपात केल्याचा आरोप केला आहे.शहरातील खोलेश्वर प्राथमिक शाळेजवळ राहत असलेले  फारुख लतीफ मोमीन हे तालुक्यातील धायगुडा पिंपळा दूरदर्शन केंद्र जवळ वीटभट्टीचा व्यवसाय करतात रविवार
दि 22 संध्याकाळी घराबाहेर जाताना मित्रासोबत जेवायला जाणार म्हणून त्यांनी घरी सांगितले तेव्हापासून ते घरी परत आले नाही.  त्यांचा शोध घेऊन ही ते सापडले नाही याबाबत मंगळवारी त्यांचे मुलाने अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती.वरवटी पिंपळा शिवार पुला जवळ मंगळवारी चार वाजता शेतात डोक्यावर जबर मार व चेहरा विद्रूप अवस्थेत मिळून आला. या मृतदेह ची माहिती  बर्दापूर पोलिसांनी दिली सदरील मुतदेह  बेपत्ता असलेल्या
फारुख मोमीन यांचा वर्णनाचा असल्याने पंचनामा करून शव तपासणीसाठी स्वाराती  रुग्णालयात पाठवले आहे.  दरम्यान फारुख मोमीन यांचा घातपात केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.  त्यांचे पक्षात तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा