२०२१ च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत दिल्लीत एलपीजी सिलेंडरची किंमत ६९४ रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढून ७१९ रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली. १५ फेब्रुवारीला पुन्हा किंमत वाढून ७६९ रुपये करण्यात आली. यानंतर, २५ फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलेंडरची किंमत कमी होऊन ७९४ रुपये झाली. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ८१९ रुपये करण्यात आली. एप्रिलच्या सुरुवातीला १० रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत ८०९ रुपयांवर गेली होती. एका वर्षात एलपीजी सिलेंडरच्या किमतीत १६५.५० रुपयांची वाढ झाली आहे. तर डिसेंबरपासून आतापर्यंत सिलिंडरच्या किमतीत सुमारे २७५ रुपयांनी वाढ झाली आहे.
तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या १ आणि १५ तारखेला एलपीजीच्या किंमतीचा आढावा घेतात. यापूर्वी १ जुलै रोजी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ केली होती. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या सतत वाढत असलेल्या किंमतींमुळे केंद्र सरकारवर बरीच टीका होत आहे. पण हे सर्व आंतरराष्ट्रीय किंमतींवर अवलंबून आहे आणि सरकारच्या हातात काही नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
0 टिप्पण्या