Subscribe Us

header ads

बंजारा समाजाचा राष्ट्रीय आवाज संघर्ष भुमित कडाडला तांड्याचा संघर्ष व्यवस्थेला नाकारू देणार नाही -अरूण चव्हाणगोर सेनेच्या नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष अरूण चव्हाण यांचे बीडमध्ये जंगी स्वागत

बीड, दि.17 (प्रतिनिधी)ः- ऊसतोड कामगार म्हणून असलेली पीढीजात ओळख घेवून तांड्यावरचा कामगार आजही विकासाच्या मुख्य प्रवाहपासून दूर आहे. राजकीय सजग व स्वाभिमान अंगिकारून येणार्‍या काळात आम्ही संघर्ष करून माझ्या समाजाच्या जिवावर मोठे होणारी नेतृत्व आम्हाला पाठ दाखवून गेले म्हणून यापुढे गोर सेनेच्या माध्यमातून आपला समाज आपला नेता या नितीने पुढील काळात गोर समाज बाधू असे गोर सेनेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष अरूण यांनी म्हणले त्यांचे काल बीड येथे जंगी स्वागत करण्यात आले.
नवतरूणांना सोबत घेवून नवे विचार आणि नव्या ध्येय धोरणानुसार महाराष्ट्रात गोर सेनेची तादक वाढविणासाठी आणि संघटन मजबुत करण्यासाठी तसेच बंजारा समाजाचा विकासापासून कोसोदूर ठेवले जात असून समाजाला विकासाच्या मुख्यप्रवाहत आणण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अरूण चव्हाण हे सध्या महाराष्ट्र भ्रमण करत असून मंगळवारी बीड शहरात आगमन झाले असतांना येथील शहरातील तुलसी इंग्लिस स्कूल येथे बीड जिल्हा कार्यकारणीच्या वतीने सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करत भव्य सत्कार समारंभ साजरा केला. यावेळी जिल्हा परिषद सभापती बाबुराव जाधव, देवगिरी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रोडे सर, वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुंदर राठोड, माजी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संगिता चव्हाण, राजेश जाधव यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थित होती. तर कार्यक्रम आयोजक गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष अरूण पवार, देविदास चव्हाण, सह संयोजक बिभीषण राठोड, विभागीय संघटक विलास चव्हाण, उपाध्यक्ष एकनाथ चव्हाण, तालुका अध्यक्ष कृष्णा राठोड, मानकुरवाडी सरपंच ज्ञानेश्‍वर जाधव, नाळवंडी सरपंच ज्ञानेश्‍वर पवार, विलास राठोड यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा