Subscribe Us

header ads

ग्राम शाखा व बूथ कमिटी बांधणी करून सक्रिय कार्यकर्त्यांची फळी उभारा.वंचित बहुजन आघाडी च्या पश्चिम विभागाच्या आढावा बैठकीत अशोक हिंगे यांचे प्रतिपादन

(बीड प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सद्यस्थितीत प्रमुख भूमिकेत असुन अल्पावधीतच नावलौकिक मिळणारा राजकीय पक्ष ठरला आहे. डिसेंबर मध्ये होऊ घातलेल्या  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी सर्व ताकदीनिशी पक्ष उतरणार आहे.तेव्हा या निवडणुकीत येथील प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ता हाच पक्षाच्या अग्रस्थानी असणार आहे. म्हणूनच गाव तेथे शाखा व घर तेथे सक्रिय कार्यकर्ता यांची फळी उभारावी.असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी केले.दिनांक 23 ऑगस्ट रोजी येथील  शासकीय विश्रामगृहावर आयोजित कार्यकर्ता संवाद व आढावा बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून अशोक हिंगे बोलत होते.पुढे बोलताना हिंगे म्हणाले की, गावागावातील सर्व जाती-धर्मांतील ऊपेक्षित,वंचित घटकांपर्यंत पक्षाचे ध्येय धोरणे व मूल्य रुजवावीत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडी मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील हे होते प्रमुख पाहुणे वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा उपाध्यक्ष ऍड अशोक खरात व दिपक डोके यांचेसह लोकसभा उमेदवार विष्णू जाधव विष्णू देवकते, माजी जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर, धम्मानंद साळवे, अनंतराव सरवदे भगवंत आप्पा वायबसे हे विचार मंचावर उपस्थित होते.वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ऍड.अशोक खरात यांनी आपल्या मार्गदर्शक भाषणात म्हटले की, निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्त्यांच्या खांद्यावर पक्षाचे यश-अपयश अवलंबून असते.म्हणून कार्यकर्त्यांनी पक्षा प्रति आपली निष्ठा सदैव जागृत ठेवली पाहिजे.या कार्यक्रमास जिल्हा पदाधिकारी सचिन मेंघडंबर  भारत तांगडे, संतोष जोगदंड अंकुश जाधव,दगडू दादा गायकवाड, डॉ, गणेश खेमाडे, सुदेश पोतदार अजय सरोदे, ज्ञानेश्वर कवठेकर, बालाजी जगतकर, सुभान भाई पप्पु गायकवाड युनुस भाई किशोर भोले,समाधान गायकवाड,किरण वाघमारे, पुष्पाताई तुरकमारे,  भीमराव पायाळ,श्रीकांत वाघमारे,ऋषिकेश वाघमारे, राजेश कवठेकर, मेजर अनुरथ वीर, बाळासाहेब गायकवाड,गोरख झेंड,बापू नाना आहेर, दिलीप माने अवसरमल विश्वजित डोंगरे राजेंद्र कोरडे अजय साबळे यांचे सह वंचीत बहुजन आघाडीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकिचे सुत्रसंचलन बबनराव वडमारे यांनी तर आभार प्रदर्शन भारत तांगडे यांनी केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा