Subscribe Us

header ads

द केंब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा

गेवराई ( प्रतिनिधी )-: भाऊ-बहिणीमधील प्रेम व स्नेह वृद्धिंगत करणारा रक्षाबंधन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना संसर्गामुळे सणावर काही प्रमाणात निर्बंध येत असले तरी रक्षाबंधनाने भाऊ-बहिणीचे नाते घट्ट बांधण्यात आले. रविवारी सुटीच्या दिवशी रक्षाबंधन असल्याने आज मंगळवारी शहरातील द केंब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळूनच रक्षाबंधन उत्साहात साजरा केला. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून पोस्टर बनवले आणि शाळेच्या आर्ट गॅलरीचे सुशोभिकरण केले. शाळेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनी राखी बांधून आणि चॉकलेट वाटून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला. अनेक दिवसांपासून शाळा बंद होत्या त्या मुळे शाळेत साजरे होणारे विविध उपक्रम बंद झाले होते. आशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सप्त कलागुणांचा विकास होऊन सामाजिक जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते अशे मत शाळेच्या संचालिका डॉ. वर्षा मोटे यांनी व्यक्त केले तर मुख्याध्यापक डॉ. आदित्य जोशी यांनी पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे शुध्द पर्यावरण वाचवण्यासाठी वृक्षांचे महत्त्व स्पष्ट केले. कोरोणा चे सर्व नियम पाळून रक्षाबंधन साजरा केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ बी. आर. मोटे यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. याप्रसंगी उपप्राचार्य विजयकुमार खरात यांनी वेगवेगळ्या भारतीय उत्सवांचे महत्त्व समजावून सांगितले़ तसेच रक्षाबंधन पर्वाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व पटवून दिले. सूत्रसंचालन राहुल जाधव तर आभार प्रदर्शन सुशिल टकले यांनी केले. यावेळी गणेश नन्नवरे, लहु राठोड, अक्षय वांजोळे, विलास घोरतळे, सचिन अंभग, ओमकार दहिवाळ, अनुप डांगे व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा