Subscribe Us

header ads

पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड अडचणीत?पोलिसांच्या हाती लागला महत्वाचा पुरावा


पुणे-: पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे. 
आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं.
 या सर्व संभाषणांचं रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलं आहे. 
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार,
 पूजाच्या मोबाइलमध्ये सापडलेल्या या संभाषणांमधील एक संभाषण ९० मिनिटं चाललं होतं अशी सूत्रांची माहिती आहे.
 पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारीला पुण्यात इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. 
आत्महत्येसाठी शिवसेनेचे यवतमाळमधील आमदार संजय राठोड यांना जबाबदार धरलं जात असून यामुळे २८ फेब्रुवारीला त्यांना वनमंत्रीपदाचा राजीनामादेखील द्यावा लागला.
 “प्राथमिकदृष्ट्या फोनमधील संभाषणावरुन समोरील व्यक्ती संजय राठोडच असल्याचं दिसत आहे.
 तिने आपली सर्व संभाषणं रेकॉर्ड केली होती. 
हे संभाषण बंजारा भाषेत झालं असल्याने आम्ही भाषांतर करुन घेत आहोत,” अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 
संजय राठोड आणि पूजा चव्हाण दोघेही एकाच आदिवासी बंजारा समाजातून होते. 
मूळची बीडची असणारी पूजा शिक्षणासाठी पुण्यात राहत होती. 
आत्महत्येनंतर तिच्यात आणि संजय राठोड यांच्यात संबंध असल्याचा आरोप झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक