Subscribe Us

header ads

डोळ्याने न पाहता काम करू शकणारा व्यक्ती असामान्य असतो - धनंजय मुंडे


ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या संपूर्ण संगणक तंत्रज्ञान या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे ना. मुंडेंच्या हस्ते प्रकाशन संपन्न


मुंबई (दि. 05) ---- : डोळ्याने दृष्टिहीन असून न पाहता काम करू शकणारा व्यक्ती असामान्य असतो. दिव्यांग व्यक्तींबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यापेक्षा त्यांना शक्ती देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

नाशिक येथील ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेने अंध दिव्यांग बांधवांसाठी निर्मिलेल्या संपूर्ण संगणक तंत्रज्ञान या पुस्तकाचे श्री. धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे प्रकाशन करण्यात आले.

संगणकाची ओळख, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, डेटा एन्ट्री आदी विषयांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला असून, 5 भागांतील या पुस्तकाचे लेखन श्री. हेमंत दवे व श्रीमती गौरी कापुरे यांनी केले आहे. या प्रकाशन कार्यक्रमास ना. मुंडे यांच्या सह संस्थेचे अध्यक्ष अरुण बारस्कर, संचालक अर्जुन मुद्दा, मानद अध्यक्ष सौ. कल्पना पांडे, उपाध्यक्ष विश्वासराव गायकवाड, कोषाध्यक्ष विजया दवे आदी उपस्थित होते.

संस्थेने ब्रेल लिपीतील पुस्तकांचे प्रिंटिंग करण्यासाठी विभागाकडे मागणी केली असून, त्यास श्री. मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अद्ययावत प्रिंटर उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यातील अंध बांधवाना ब्रेल लिपीतील संगणकाची माहिती देणारे पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल ना. मुंडे यांनी राज्य सरकारच्या वतीने ब्लाइंड वेल्फेअर संस्थेचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा