Subscribe Us

header ads

वाकनाथपुर ते म्हाळस जवळा रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांचे हाल.

प्रतिनिधी. नवनाथ गोरे. मो 9823310880




(वाकनाथपुर प्रतिनिधी) वाकनाथपुर ते म्हाळस जवळा हा रस्ता भाटसांगवी.वाकनाथपुर.रज्जाकपुर . म्हाळस जवळा.या गावाला जोडणारा रास्ता आहे.हा ५ की मी चा रस्ता दोन वर्ष झाले काम चालु केलेल परंतु दोन वर्षा नंतर ही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही.रस्त्यावर फक्त खडी आणि मुरूम टाकल्याने रस्त्यावर खुप चिखल होत आहे.चिखल झाल्याने गावातील नागरिकांना बाहेर जाण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे गावातून बाहेर निघण्यासाठी कोणत्याही बाजूने रोड झालेला नाही.कोणाला दवाखान्यात नेण्यासाठी चीखल झाल्याने गाडी लवकर जात नाही ५ की मी रस्त्यासाठी २ वर्षाचा कालावधी का लावत आहेत वाकनाथपुर गावला तीन बाजूने नद्या आहेत आणि ऐकाही नदीवरती पुल बांधलेला नाही नदीला पाणी आले असता गावकऱ्यांना बाहेर निघता येत नाही गाड्या नदिपलिकडे उभ्या करावा लागतात आणि त्यात परत रस्ता चिखलमय होत आहे.रस्त्यांचे काम का बंद आहे हे वरीष्ठ अधिकारी यानी चौकशी करून रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन घ्यावे नसता गावकरी रस्त्यावर उतरतील असे गावकरी बोलत आहेत.गावामध्ये हातपंप चालु नाही
गावच्या नाल्या साफ नाहीत गावाला जाण्यासाठी रस्ता नाही
गावच्या नदिवरती पुल नाही आणि आश्वासन देणारे भरपूर आहेत.गावात मोठे मोठे नेते येतात आश्वासन देऊन जातात परंतु काम मात्र कोणी करत नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा