Subscribe Us

header ads

बीडमध्ये ११ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार…नराधमाला संतप्त महिलांकडून चपलेने मारहाण…

बीड-: बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत पैशाचे आमिष दाखवून अकरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी पीडितेच्या आई च्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम आरोपीला अटक केली आहे. विक्रम भगवान पवार अस आरोपीच नाव असून आरोपीने मुलीला पैशाचे आमिष दाखवून तिला मका च्या शेतात नेऊन अत्याचार केला. या मुळे एकच खळबळ उडाली असून आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये महिला सामाजिक कार्यकर्त्यानी आरोपीला चप्पलने मारहाणीचा प्रयन्त केला. या घटनेने संताप व्यक्त केला जात असून नराधम आरोपीला कठोर शिक्षा करावी  अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली. व बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत एका 11 वर्षीय चिमुकलीला खाऊ साठी पैशा चे अमिश दाखवून गावातील 25 वर्षीय आरोपीने तिला मकाच्या शेतात नेले त्या ठिकाणी अत्याचार केला, शेजारच्या लोकांनी पाहिल्यानंतर पीडित मुलीची सुटका केली,तसेच आरोपीला चोप दिला. त्यानंतर पोलिसांच्या हवाली केले, या सर्व प्रकरणी नेकनूर पोलिसात पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा