Subscribe Us

header ads

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणातून शशी थरूर यांची निर्दोष सुटका

दिल्लीतील हॉटेल लीलामध्ये रुम नंबर ३४५ मध्ये सुनंदा मृतावस्थेत आढळल्या होत्या.





दिल्ली-: सुनंदा पुष्कर आत्महत्या प्रकरणातून सुनंदा यांचे पती आणि खासदार शशी थरूर यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. २०१८ साली दिल्ली पोलिसांनी कोर्टात तीन हजार पानी आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात दिल्ली पोलिसांनी सुनंदा यांचे पती आणि खासदार शशी थरुर यांच्या नावाचा आरोपीमध्ये समावेश केला होता.
२०१४ साली दिल्लीतील हॉटेल लीलामध्ये रुम नंबर ३४५ मध्ये सुनंदा मृतावस्थेत आढळल्या होत्या. ही हत्या नसून आत्महत्या असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले होते.तब्बल सात वर्षे चाललेला लढा अखेर संपला. आम्हाला न्यायव्यवस्थेवर सुरुवातीपासूनच पूर्ण विश्वास होता, अशी भावना थरूर यांचे वकील विकास पाहवा यांनी व्यक्त केली आहे.शशी थरुर यांच्यावर पत्नी सुनंदाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात हत्येच्या कलम ३०२ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. १७ जानेवारी २०१४ रोजी दक्षिण दिल्लीतील हॉटेल लीलामधील रुम नंबर ३४५ मध्ये सुनंदा पुष्कर मृतावस्थेत आढळल्या होत्या. घटनेच्याच रात्री तपासासाठी या रुमला टाळे ठोकण्यात आले होते.सुनंदा पुष्कर यांच्या शरीरावर दाताने चावल्य्याच्या खुणा, सिरींजच्या खुणा आणि झटापट झाल्याने जखमा झाल्याच्या खुणा आढळल्या होत्या. या खुणांमुळे त्यांची हत्याच झाली असावी असे स्पष्ट होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा