Subscribe Us

header ads

परळी बसस्थानकाचे रुपडे पालटणार; व्यावसायिक कॉम्प्लेक्ससह बसस्थानकाच्या बांधकामाचा नवीन आराखडा सादर करा - परिवहन मंत्री अनिल अरब यांचे निर्देश

*पूर्वीच्या आराखड्यात त्रुटी, जुने टेंडर रद्द करून सुधारित दाखल करण्याचे निर्देश*

*अनिल परब - धनंजय मुंडे यांची मंत्रालयात बैठक*



मुंबई (दि. 12) ---- : बीड जिल्ह्यातील परळी बसस्थानकाच्या विकासाच्या पूर्वीच्या आराखड्यात त्रुटी असून, बसस्थानकात व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभारून आधुनिक पद्धतीने बांधकाम करण्यासाठी बसस्थानक विकासाचा नवीन आराखडा तातडीने मंजुरीसाठी सादर करण्यात यावा असे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री ना.अनिल परब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या विनंतीनुसार यासंदर्भात आज मंत्रालयात श्री. परब यांच्या दालनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ना. अनिल परब, ना. धनंजय मुंडे यांच्यासह परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी, परळी न.प.चे गटनेते वाल्मिक अण्णा कराड तसेच बीड विभागाचे परिवहन नियंत्रक आदी उपस्थित होते.

परळी शहरातील बसस्थानाकाच्या नूतनीकरण, सुशोभीकरण व अन्य सुविधांच्या निर्माण कामासाठी आवश्यक निधी मंजूर आहे मात्र पूर्वी मंजूर करण्यात आलेला आराखडा सदोष आहे. तसेच बसस्थानकाच्या रिकाम्या जागेत एका बाजूने व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभारणे व त्याच्याच दुसऱ्या बाजूस बसस्थानक उभारणे हे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने देखील सोयीचे असल्याचे मत श्री.परब यांनी व्यक्त केले. त्यास ना. धनंजय मुंडे यांनी दुजोरा देत. सदर आराखडा नवीन आर्किटेक्ट नियुक्त करून तातडीने तयार करून मंजूर करावा असे सुचवले. त्यास श्री. परब यांनी मान्यता दिली असून, व्यावसायिक व आधुनिक दृष्टिकोनातून बसस्थानकाचे काम विहित वेळेत पूर्ण करण्यात यावे यासाठी ताफीने पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा