Subscribe Us

header ads

बीड शहरातील एमआयडीसी भागात नवीन पोलीस ठाणे कार्यान्वित करा आ.संदिप क्षीरसागर यांची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी

बीड (प्रतिनिधी):- बीड शहरातील औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) भागात व्यापारी बांधवांच्या तसेच नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन पोलीस ठाणे मंजुर करून बांधकामास तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी बीडचे आमदार संदिप भैय्या क्षीरसागर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
बीड शहरातील एमआयडीसी भागात मागील अनेक वर्षापासून व्यापारी बांधवांची नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्या संदर्भात मागणी प्रलंबित होती. याबाबत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी पाठपुरावा करत बीड शहरातील एमआयडीसी भागातील व्यापार्‍यांची मागणी लक्षात घेता एमआयडीसी भागात नवीन पोलीस ठाणे कार्यान्वित करून पोलीस ठाणे बांधकामासाठी आवश्यक तो निधी देण्यात यावा अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस उपमहानिरीक्षक औरंगाबाद यांच्या मार्फत तात्काळ अहवाल मागवून याबाबत कार्यवाहीच्या सूचना गृहमंत्री महोदयांनी दिल्या आहेत. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या या मागणीमुळे एमआयडीसी भागातील व्यापारी बांधवांच्या मागणीला लवकरच यश येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा