Subscribe Us

header ads

मंडळ अधिकारी यांचा वाळू माफियांच्या विरोधात कारवाई केल्याचे सोंग जप्त केलेला वाळू साठा रात्रीतून गायब???


(बीड प्रतिनिधी) बीड तालुक्यातील शिंदफना नदी पात्रातून रात्र दिवस अवैध वाळू उपसा चालु आहे अशा अनेक तक्रारी मंडळ अधिकारी  यांच्याकडे आले होते.या तक्रारीची दखल घेत मंडळ अधिकारी यांनी वाळू माफियांचा विरुध्दात ठोस पाऊले  उचलीत कारवाई केली असे बोलले जाते. दि२६/८/२०२१ रोजी कुक्कडगाव येथे शिंदफणा नदी पात्रात अवैध वाळूचा साठा असल्याची माहिती मंडळ अधिकारी  यांना मिळाली असता लगेच त्यांनी उपविभागीय अधिकारी मा श्री टिळेकर साहेब, श्री सुरेन्द्रजी डोके साहेब, तहसीलदार बीड , श्री अरुण गुरसाळे , श्री दत्तू रोहिते यानी संध्याकाळी चार ते पाच च्या दरम्यान कुक्कडगाव येथे जाऊन वाळू माफियांच्या विरुध्द कारवाई करत ५३ ब्रास वाळूसाठा जप्त केले असे मंडळ अधिकारी सांगत आहेत. कारवाई केली असे सांगून मंडळ अधिकारी या भागातील नागरिकांची आणि शासनाची दिशा भुल करत आहेत. जर ५३ ब्रास  वाळू साठा जप्त केला तर मग ती कुठे आहे?  असा सवाल गावातील लोक विचारीत आहे. जप्त केलेला तो वाळू साठा खंडोबा मंदिर शेजारी होता रातोरात वाळूमाफियांनी तो भरून नेला आहे असे या गावातील लोक सांगत आहे.मंडळ अधिकारी हे कुक्कडगाव येथे कारवाई करण्यासाठीं आले नव्हते ते आले होते फक्त  हे दाखवण्यासाठी की आम्ही वाळूमाफिया विरोध आहोत आम्ही वाळू माफिया विरुद्ध कारवाई केली हे दाखवण्यासाठी हे वाळू माफिया बिनधास्तपणे गावात बोलून दाखवीत आहे की हे अधिकारी काही करू शकत नाही आमचा हात त्यांचे डोके वर आहे.मंडळ अधिकारी हे कुक्कडगाव येथे कशासाठी गेलते आणि त्यांनी तेथे जाऊन कोणती कारवाई केली आणि कारवाई केली होती तर जप्त केलेला  ५३ ब्रास वाळूसाठा कुठे आहे? असा सवाल या गावातील लोक करीत आहे याची चौकशी मा. जिल्हाधिकारी साहेबांनी लवकरात लवकर करावी आणि अशे  भ्रष्ट अधिकाऱ्याविरुद्ध लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी या गावातील लोक करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा