Subscribe Us

header ads

नदीला पाणी आल्याने वाकनाथपुर गावकऱ्यांचे हाल

प्रतिनिधी नवनाथ गोरे मो. 9823310880

(वाकनाथपुर प्रतिनिधी) वाकनाथपुर या गावचे हाल जाणणारे कोणी नाही वाकनाथपुर हे गाव बीड पासुन अवघे 15 की मी अंतरावर आहे.मात्र या गावचा विकास काहीच झाला नाही.
वाकनाथपुर या गावला तीन बाजूने नद्या आहेत
नदीचे पाणी ओलांडुन अनेक राजकीय नेते गावात मतदान मागण्यासाठी आले नदीवर पूल बांधण्याचे आश्वासन अनेक वेळा देऊन गेले पण नेते येतात आश्वासन देतात पुल मात्र कोणी बांदत नाहीत गावला पुल नसल्याने गावकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत आज दि 23 /8/ 2021 रोजी झालेल्या पाऊसाने नदीला पाणी आले असता गावकऱ्यांचे हाल होत आहेत गावातून गाड्या बाहेर निघत नाहीत
काही गावकरी गाडी बैलाच्या साह्याने मोटासायकल बाहेर काढत आहेत.आज गावामध्ये थंडी ताप ची साथ सुरू आहे
आणि गावामध्ये कोणताही दवाखाना नसल्याने गावातील नागरिकांनी पेशंटला दवाखान्यात कसे न्यायचे शेतीच्या कामासाठी बैल गाडी शेतात असतात तर दवाखान्यात नेण्यासाठी बैल गाडीची वाट पाहत बसावे लागते 
तेव्हड्यात पेशंटला काही कमी जास्त होण्याची  शक्केता  जास्त असते गावातील नागरिक बोलत आहेत की राजकीय नेते फक्त मतदान मागण्यासाठी आहेत का कधी निवडणूक झाल्यावर एखाद्यावेळेस गावकऱ्यांचे हाल बघण्यासाठी पण येते जा आणि लवकरात लवकर पुल बांधून घेऊन गावकऱ्यांना जण्या येण्याचा मार्ग सुरू करा प्रत्येक वर्षी पाऊसळ्यात या गावकऱ्यांना अनेक संकटाला सामोरे जावे लागत आहे.पाऊसळ्यात एखादा वायोवृद्ध जर मृत्यु पावला तर त्यालाही बैल गाडीतच गावातआणावे लागते सर्व अंतविधीचे सामान ही बैल गाडीनेच आणावे लागते या गावकऱ्यांना आता विकास हवा आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक