Subscribe Us

header ads

शेतातून ट्रॅक्टर जाऊ दिले नाही म्हणून विवाहितेवर अत्याचार

केज-: बीड जिल्हात गुन्हेगारी सत्र चालूच आहे बीड जिल्ह्यांतील केज तालुक्यामध्ये ऐका विवाहितेवर घरात घुसून अत्याचार करण्याची घटना घडली आहे.
आरोपी संदीपान विश्वनाथ चौरे हा पिडीत महिलेचा शेतातून ट्रॅक्टर घेउन जात असताना पिडीत महिलेने शेतातून ट्रॅक्टर घेउन जाऊ नको म्हणून आरोपीला अडवले. त्याचा गोष्टीचा राग मनामध्ये धरुन रक्षाबंधनाच्या दिवशी दि.२२ ऑगस्ट रोजी घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपी संदीपान विश्वनाथ चौरे यानी पिडीत महिलेवर बळजबरीने  अत्याचार केला पिडीत महिलेने विरोध केला असता त्याने महिलेला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली.परत सकाळी आरोपीचा भाऊ सुखदेव चौरे. आणि वडील विश्वनाथ चौरे हे पिडीत महिलेच्या घरी जाऊन अत्याचार केल्याची घटना दीराला का सांगितली आत्ता तुझ्या नवऱ्याला आणि तुला जिवंत ठेवणार नाहीत. असे म्हणुन महिलेला धमकी दिली.
या प्रकरणी पिडीत महिलेने आरोपी संदीपान विश्वनाथ चौरे. भाऊ सुखदेव चौरे वडिल विश्वनाथ चौरे. यांचा विरोधात दि.२२ऑगस्ट रोजी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली ठाणे अंमलदार सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे  यांनी तीन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला.आणि आरोपीला पकडण्यासाठी चिंचपुर शिवारात वस्तीवर आरोपी झोपलेले असताना तिघांना ही अटक केले आणि न्यायलाया समोर हजर करून न्यायलयाने संदीपान चौरे. सुखदेव चौरे. आणि विश्वनाथ चौरे यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा