Subscribe Us

header ads

स्त्रियांच्या भावना कोणी समजून घेईल का?

प्रतिनिधी नवनाथ गोरे मो.9823310880




बीड-: सन २०१९, २०२० वर्ष खूप धामधुमीत चिंतेत गेले आहे १५ मार्च २०२० पासून कोरणा या मारीला सुरुवात झाली आणि संपूर्ण जग पृथ्वी यांना धोका निर्माण झाला होता, तर १५ मार्च २०२० पंधरा दिवसाचा पहिला टप्पा लॉक डाऊन  केल सगळ जग पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं नंतर १ एप्रिल २०२० दुसरा टप्पा लॉक डाऊन केले आणि असे  दहा महिने पूर्ण झाले तरी लॉकडाऊन उघडण्याचे नाव घेत नव्हता
किरोना विषाणूचा प्रसार चीन ( वुहान) येथे झाला किरोनाला covid-१९ हे नाव world health organisation या संस्थेने घोषित केले कोरोना हा लॅटिन भाषेतील शब्द आहे कोरणा हा विषाणू मानवाच्या फुफ्फुसे या भागावर हल्ला करतो तसेच भारतात केरळ मध्ये कोरोना चा पहिला रुग्ण सापडला महाराष्ट्रात पुणे येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला कोरोनामुळे  लॉकडाऊन करणारे पहिले राज्य राजस्थान आहे . कोरोना मुळे कर्फ्यू लागणारे पहिले पंजाब राज्य आहे ,तसेच भारत सरकारचे ॲप विकसित केले आहे ते म्हणजे आरोग्य सेतू असं नाव दिला आहे. कोरोनाच्या लसीकरणासाठी co-win ॲप विकसित झाले आहे. कोरोना या व्हायरसमुळे प्रत्येक जण स्वतःच स्वतःची काळजी घेत आहे आणि स्वतः बरोबर इतरांनाही सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे,
पहिली लाट आली तेव्हा असं बोलायचे की कोरोना चा रुग्ण संपर्कात आला की भीती असायची पण मला असं वाटतं असं जर झालं असतं तर एकही माणूस या जगात जिवंत राहिले नसते अस मानव मृत्युमुखी झाले असते या रोगामुळे काहींचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे कारण लॉक डाऊन म्हटलं की घरातच रहा काळजी घ्या असा संदेश प्रत्येक मोबाईलवर टेलिव्हिजनवर पाहायला ऐकायला भेटायचं तर काहीच सदुपयोग झाले असे पण म्हणता येईल ज्यांना एक दिवस पण सुट्टी ( holiday)नव्हता त्यांना भरपूर( Holiday) मिळाला सगळे कामे बंद असल्या कारणाने तरुण पिढी व बरेचसे लोक गावी येऊन राहू लागले काहीजण शेतातले काम पण शिकली तर काहीजण फक्त आळशी झाले. पण ह्या लॉकडाउनच्या काळात माझ्या लक्षात एकच गोष्ट आली
घरातल्या प्रत्येक मानवाला सुट्टी मिळाली म्हणजे मुलांना म्हातारी माणसे आजी आजोबा तरुण लोकांना वडील भाऊ काका दीदी या सगळ्यांना त्यांच्या कामातून वेळ  घालवता आला सगळ्यांनी भरभरून सुट्टीचा आनंद घेतला पण ज्या व्यक्तीला अजून पण व्यक्त व्हायला घाबरते ती माझी आई माझ्या काकी यांना  लॉकडाउनच्या काळात एक पण दिवस सुट्टी मिळाली नाही आणि ह्याआधी पण नव्हती मिळाली
त्या माझ्या आईला काकीला घरातल्या प्रत्येक महिलेला सुट्टी मिळाली नाही आणि त्यांचा विचार पण कोणी केला नाही असं मला वाटतं सगळे म्हणतात मी कमवतो पण तुम्ही कमवता म्हणजे नक्की काय करता ? फक्त सामान आणून देतात पण त्याच महिलांनी ठरवलं एक वेळेच काम नाही करायचं जेवण नाही बनवायचं मग कळतं घर कमावती कोण असतं ?  मुलांना भूक लागली तर आईच लागते असे विचार फक्त तिला होणारा त्रास समजून घ्या त्या स्त्रीला म्हणून मग असं झालं तर भारताचं काय संपूर्ण जगात स्त्रियाला मान सन्मान तिचा अभिमान सगळं भरून येईल सगळ्यात जगात एकच नाव असलं ते म्हणजे महिलांच जग अरे ती आई काकी मावशी दीदी आत्या ज्या कोणी महिला असतील त्या सगळ्या आडाणी असत्या तर त्या स्त्रीयांनी मागेच त्यांचा विचार केला असता प्रत्येक घरातील महिला उच्च पदावर असती पण ती अडाणी नाही तर खूप प्रेमळ स्वामीनिष्ठ हुशार कर्तबगार आहे म्हणून मी एवढच म्हणन त्या स्त्रीयांनीच आपली संस्कृती जपली आहे स्त्रियांच मी मध्येच वर्णन केले आहे कारण मला आलेला अनुभव मी मांडला आहे पण हे कडवट वाटलं वाटलं पण खरं आहे असं मला वाटतं तसेच १५ मार्च २०२० पासून फक्त गरजेच्याच वस्तू मिळू लागल्या परत नवीन २०२१ वर्ष चालू झाले पण जानेवारी व फेब्रुवारी २०२१ मधले दोन महिने परत सगळे जग चालू केलं म्हणजे unlock केलं परत १५ मार्च २०२१ रोजी लॉक डाउन केलं पहिला टप्पा पंधरा दिवसाचा होता तर दुसरा टप्पा पंधरा दिवसाचा होता असं चार टप्प्यापर्यंत लोकडाऊन पोहोचला आहे पण या महामारीत बरेचसे लोक असे आहेत की ज्यांना एक वेळचे जेवण मिळालं नाही त्यांचं कुटुंब व त्यांची माणसं कसं जीवन जगत असतील? तर काही लोकांचे या मारामारीत प्राण गमावले मृत्यू पावले कोणाची आई कोणाचा मुलगा तर कोणाचे वडील तर कोणाचा भाऊ तर कोणाची बहीण कुठे गेले हे नाते का नाही वाचऊ शकलो आपण त्या सर्वांना देवा सांग तु तरी 
कोरोना कोरोना कोरोना 
कधी जाशील तू तुझ्या गावाला
दीड वर्ष झालं तरी तुला काहीच कसं वाटत नाही
माफ कर आम्हाला सोडून दे रे तुझ्या लेकरांना
ऑक्सिजन पुरवठा कसा करायचा
व्हेंटिलेटर आणि बेड मिळाला तर बरं वाटेल आम्हाला
डॉक्टर पोलीस कर्मचारी करतायेत त्यांची ड्युटी तू मात्र केली सगळ्यांशी कट्टी
शाळा नाही कॉलेज नाही holiday असून उपयोग काय तुझा?
उन्हाळा गेला पावसाळा आला
आता तरी सांग कधी जाशील तू तुझ्या गावाला?
सगळेजण म्हणतात भीती वाटते तुझी आम्हाला

धन्यवाद
नाव ,चाळक किरण विलास मो.
९५०३५७७२४५

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा