Subscribe Us

header ads

नारायण राणेंच्या घराबाहेर भा.ज.पा. कार्यकर्ते आणि युवासैनिकांमध्ये तुफान राडा.

 
मुंबई-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. रायगड येथील महाडमध्ये राणेंची जन आशिर्वाद यात्र पोहचली त्यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणेंनी मी असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य केल्याचं पहायला मिळालं.या वक्तव्यानंतर मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात शिवसेनेकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. 
दरम्यान, नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू येथील बंगल्यावर युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. जुहू इथल्या नारायण राणे यांच्या घराबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आलेल्या मोठा गोंधळ उडाला आहे. 
वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुंबईत युवासेना आणि भा.ज.पा. कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानावर धडक देत आंदोलन सुरु केलं आहे. युवासेनेचे कार्यकर्ते बंगल्यापर्यंत पोहचू नयेत यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र वरुण सरदेसाई यांनी बंगल्यापासून जवळच ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा