Subscribe Us

header ads

संजय राऊत यांची नारायण राणे वर टीका!

मुंबई-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. रात्री उशीरा त्यांना जामीन मंजूर झाला. मात्र काल दिवसभर या प्रकरणावरुन शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये दिसून आले. असे असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मात्र कुठेच प्रतिक्रिया देताना किंवा यावर व्यक्त झाले नाही. आज म्हणजेच बुधवारी न्यायालयाच्या जामीनासंदर्भातील निकालाचे आदेश समोर आल्यानंतरही राऊत यांनी कोणतीच थेट प्रतिक्रिया दिलेली नसली तरी ट्विटरवरुन त्यांनी पोस्ट केलेला एक फोटो सध्या चर्चेत आहे.
संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारची मोट बांधण्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ दररोज शेरोशायरीमधून सूचक इशारे देणारे ट्विट केल्याचा संदर्भ असतानाच महाराष्ट्रासहीत देशभरामध्ये चर्चा झालेल्या राणेंच्या अटकेवरही त्यांनी एका फोटोच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिलीय. राऊत यांनी केवळ आज या एका शब्दासहीत एक फोटो ट्विट केला. या फोटोमध्ये वाघाच्या तोंडामध्ये कोंबडीच्या पिल्लाला दाखवण्यात आले आहे. फोटोवर ‘आजचा दिवस थोडक्यात’ असे लिहिलेले आहे. या फोटोमधून राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला. राजकारणामध्ये येण्यापूर्वी राणेंचा कोंबडी विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगितले जाते . त्यामुळेच काल शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनामध्ये अनेक ठिकाणी भाजपाच्या कार्यालयांमध्ये कोंबड्या सोडण्यात आल्या तसेच कोंबडी असा उल्लेख असणारी बॅनरबाजीही करण्यात आली. त्याचसंदर्भाने राऊत यांनी कोंबडीचे पिल्लू वाघाने तोंडात पकडल्याचा फोटो ट्विट केला. शिवसेनेची निवडणुकीच निशाणी धनुष्यबाण असली तरी डरकाळी फोडणारा वाघ ही शिवसेनेची ओळख मानली जाते. त्याचाच संबंध देत हा फोटो ट्विट करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा