Subscribe Us

header ads

आंतरराष्ट्रीय अबॅकस चॅम्पीयनशिपमध्ये प्रियदर्शनी मुंडेेचे यश

बीड प्रतिनिधी-: पुणे येथील ग्लोबल इंडियन इंटनॅशनल स्कुलची विद्यार्थीनी व बीड येथील मुळ रहिवाशी प्रियदर्शनी महादेव मुंडे हीने आंतरराष्ट्रीय अबॅकस चॅम्पीयनशिपमध्ये यश मिळवले आहे. 1 ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या परिक्षेत विविध देशातील पंधरा हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
 
विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांचा विकास करण्याच्या मार्गाने अबॅकस गणितीय पध्दतीचा उपयोग होतो. शहरातील अबॅकस स्टडी केंद्राद्वारे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्य स्तरावर, अबॅकस चॅम्पियनशिप आयोजित केल्या जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिप अरिस्टो किड्स, आंतरराष्ट्रीय अबॅकस असोसिएशन यांच्या सहकार्याने व समन्वयाने एक ऑगस्ट 2021  रोजी संपन्न झाली असून या स्पर्धेमध्ये भारत, श्रीलंका, सौदी अरेबिया, इराण, नॉर्वे, यु एस ए, मोरोक्को,  सिंगापूर, मलेशिया, साऊथ आफ्रिका, कॅलिफोर्निया, नेपाळ, अशा एकूण बावीस देशांमधील पंधरा हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवला असून सदरील स्पर्धा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम फेसबूक, ट्विटर, यूट्यूब, झूम अशा सर्व चॅनल्सवर प्रसारित करण्यात आलेला होता. यामध्ये बीडच्या सुपर जिनियस 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्कृष्ट विजयी पदक मिळविले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अतिशय मानद आणि प्रतिष्ठित समजले जाणारी अबॅकस इंटरनॅशनल सर्वोत्कृष्ट रँक प्रियदर्शनी महादेव मुंडे तिच्या लेव्हल मधील फक्त चारच मिनिटांमध्ये शंभर प्रश्न सोडविण्याचा ऐतिहासिक विक्रम तिने केलेला आहे. प्रियदर्शनीने मिळवलेल्या यशामध्ये तिच्या आई आणि वडील यांचा सिंहाचा वाटा असून त्यांना सतत योग्य ते मार्गदर्शन तिच्या शिक्षकांनी केलेले आहे असे तिने सांगितले. दरम्यान याच परिक्षेमध्ये पृथ्वीराज महादेव मुंडे यांने तृतीय क्रमांक मिळवला आहे.  आंतरराष्ट्रीय अबॅकस असोसिएशनचे आयोजकने प्रियदर्शनी व पृथ्वीराजने मिळवलेल्या यशाचे, अबॅकस स्टडी सेंटरचे प्रमुख डॉ. घोडके एस ए. अभिनंदन केले असून उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. समाजातील सर्व स्तरांमधून प्रियदर्शनीचे अभिनंदन होत असून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. सप्टेंबर 2021 महिन्यामध्ये होणार्‍या इंटरनॅशनल अबॅकस चॅम्पियनशिप करीता प्रियदर्शनी मुंडेची निवड झालेली आहे असे जिल्हा अबॅकस वितरक एस. ए. घोडके यांनी सांगितले.

या यशाबद्दल प्रियदर्शनी मुंडे हीचे प्राचार्य डॉ.एन.के.पी.अशोक राज, रश्मी भावसार, दिपाली देशमुख, अश्‍लेषा बनोदे, मनिषा पिंजरकर, प्रियंका पाटील, नितीन घाडे, अमृता द्विवेदी, शालिनी शर्मा, शिवगिर सर, गजानन करांडे, शंकर चोले यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा