Subscribe Us

header ads

अखेर १२ वीचा निकाल उद्या ४ वाजता जाहीर होणार

मुंबई -:मागील आठवड्यात १० वीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थांची १२ वीच्या निकालाकडे लक्ष लागले असून सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना ३१ जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचा आदेश दिला होता. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून अधिकृत माहिती दिली आहे.

राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा शिक्षण विभागाने अखेर जाहीर केला असून मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांचे दहावी, अकरावीतील गुण आणि बारावीच्या वर्षांतील कामगिरी ग्राह्य़ धरण्यात येणार. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यमंडळाला अवघ्या २८ दिवसांत निकालाची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली होती.

विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या १२ वीच्या निकालाचीही उत्सुकता होती.. जुलैअखेर इयत्ता १२ वी निकाल लागेल असा म्हटले गेले होते. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आल्याने अनेक कामे थांबली आहेत. यामुळे मंगळावरी ३ ऑगस्ट रोजी हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा