Subscribe Us

header ads

माजी आ. कै. रघुनाथराव मुंडे यांच्या पत्नी श्रीमती सरस्वती मुंडे अनंतात विलीन


परळी,(प्रतिनिधी):-माजी आमदार रघुनाथराव मुंडे यांच्या पत्नी श्रीमती सरस्वती मुंडे यांचे दिनांक 16 रोजी दीर्घ आजाराने मुंबई येथे जे.जे. हॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान रात्री 11 वा. त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ८३ वर्ष होते.त्यांचा पश्यात कन्या सौ. सुलोचना तात्याराव लहाने, जावई पद्मश्री डॉ तात्याराव लहाने, नात डॉ सायली लहाने, सपना लहाने, डॉ सुमित लहाने, पुतणे ॲड आत्माराम मुंडे, प्रल्हाद मुंडे ( पो.पाटील), ज्ञानोबा ( माऊली) मुंडे, नारायण मुंडे व केशव मुंडे सूना नातवंडं असा मोठा परिवार आहे. अंत्यविधी १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वा. कन्हेरवाडी येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आला.यावेळी खा. प्रितमताई मुंडे, आ. संजय दौड, डॉ विठ्ठल लहाने, फुलचंदराव कराड , काँग्रेस ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे, जुगलकिशोर लोहिया, बंकटराव कांदे, बन्सीआण्णा शिरसाट, सरपंच राजेभाऊ फड ,डॉ राजाराम मुंडे, माणिक फड, बिभीषण फड, श्रीराम मुंडे  व समस्त कन्हेरवाडी ग्रामस्थ, आप्तेष्ट  यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची  उपस्थिती होती.राख सावडण्याचा कार्यक्रमश्रीमती सरस्वती रघुनाथ राव मुंडे यांचा राख सावडण्याचा विधी आज शनिवार  दि. 18 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा