Subscribe Us

header ads

गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा; पोलीस अधिक्षकांचे आवाहन

बीड_आगामी सार्वजनिक गणेशोत्सव 2021 हा कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असल्याने बीड पोलिसांकडून नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोव्हिड -19 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून या वर्षांचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा . त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी स्थानिक प्रशासनाची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पुर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे .शासन आदेशाप्रमाणे गणेश मुर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आला असून दर्शन केवळ ऑनलाईन माध्यमाद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे .न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश व स्थानिक प्रशासनाचे मंडपबाबत धोरण याचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावेत घरगुती व सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी . श्री गणेशाची मुर्ती ही सार्वजनिक मंडळासाठी 4 फुट व घरगुती श्रीगणेश मुर्ती ही 2 फुट मर्यादितेत असावी.कोव्हिड संसर्गाच्या परिस्थिती मध्ये शक्यतो पारंपारिक गणेश मुर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर मुर्तीचे पुजन करावे,मुर्ती शाडूची पर्यावरण पुरक असावी, असल्यास त्या मुर्तीचे विर्सजन घरच्या घरी करावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा