Subscribe Us

header ads

नवीन मतदारांनी मतदान यादीत नाव समाविष्ट करावे-- सय्यद मिनहाजोद्दीन


बीड (प्रतिनिधी) लोकशाहीने दिलेल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी नवीन मतदारांनी ३० सप्टेंबर २०२१ पूर्वी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन मौलाना आजाद सेवाभावी संस्थेचे सचिव सय्यद मिनहाजोद्दीन यांनी केले आहे. याबाबत अधिक असे की १ जानेवारी २०२२ ला आपले वय १८ वर्ष झाले. त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून व नगरपालिका निवडणूक आयोगामार्फत नवीन मतदार यादीत नाव नोंदणी करावी जेणेकरून आपल्याला मतदानाचा हक्क बजावता येईल. येत्या काही महिन्यात नगरपालिका निवडणूक येत आहे त्या पार्श्वभूमीवर नवीन मतदारांना आपल्या आवश्यक त्या कागदपत्रासह तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाशी संपर्क साधावा.तसेच ज्या नागरिकांच्या मतदार कार्डात चुका असतील त्या दुरुस्तीचे ही अभियान सुरू आहे. तरी नागरिकांनी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच नवीन मतदारांनी फॉर्म क्रमांक ६ भरून आवश्य त्या कागदपत्रांची पूर्तता करावी बीड शहरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मौलाना आझाद सेवाभावी संस्थेचे सचिव सय्यद मिनहाजोद्दीन प्रसिद्धि पत्रकाद्वारे  केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा