Subscribe Us

header ads

पाथर्डीसह बीड जिल्ह्यातील शाळेचे बनावट दाखले देणाऱ्या टोळीला अटक!

पाथर्डी_सैन्यदलाच्या नोकरीसाठी बनावट दाखले तयार करून सैन्यादलाची फसवणूक करण्याबरोबर विविध प्रकारचे बनावट दाखले तयार करणाऱ्या टोळीचा पाथर्डी व नाशिक पोलिसांनी पर्दाफास केला आहे. पाथर्डी शहरातील नाथनगर परिसरात पोलिसांनी छापा टाकून या टोळीतील दोघांना जेलबंद केले असून उर्वरित चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.यावेळी पोलिसांनी विविध शाळांचे बनावट शाळा सोडल्याचे दाखले, रबरी स्टॅम्प जप्त केले आहेत. पाथर्डीसह बीड जिल्ह्यातील शाळांचे बनावट दाखल आढळून आल्याने या शाळांही आता पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत.नाशिक येथील देवळाली कॅम्प लष्कराच्या इंटेलिजन्स विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. या बाबत अधिक माहिती अशी कि नाशिक येथील देवळाली कॅम्प येथील लष्कराच्या इंटेलिजन्स विभागातील अधिकाऱ्यांनी नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकाऱ्यांना पाथर्डी येथून बनावट दाखले दिले जात असल्याची माहिती दिली.या माहितीवरून पोलिसांनी तपास केला असता शहराच्या नाथनगर विभागात असलेल्या शनी चौकातील एका इमारतीतून हे दाखले दिले जात असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी अभि माधव सहाणे (रा. साकुर ता.इगतपुरी जिल्हा नाशिक) यास बनावट ग्राहक बनवून या इमारतीत पाठवले.इमारतीत असलेल्या मारुती आनंदराव शिरसाठ (रा.जांभळी) व दत्तू नवनाथ गर्जे (रा. अकोला ता. पाथर्डी) यांना आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे असे सांगून या दोघांना दोन हजार रुपये देत शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिला. त्यानंतर पोलीस पथकाने त्या ठिकाणी छापा टाकत शिरसाठ व गर्जे यांना ताब्यात घेतले.यावेळी पोलिसांना त्या ठिकाणी तालुक्‍यातील अकोले, पिंपळगाव टप्पा, चिंचपूर इजदे, मोहरी तसेच बीड जिल्ह्यातील घाटशील पारगाव येथील विद्यालयाचे शाळा सोडल्याचे छापील बनावट दाखले या शाळांचे स्टॅम्प आढळून आले. त्यात संत भगवानबाबा माध्यमिक व कनिष्ठ विद्यालय अकोला (ता.पाथर्डी), संत भगवानबाबा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय घाटशिळ पारगाव (ता.शिरूर कासार जिल्हा बीड) श्री नागनाथ विद्यालय पिंपळगांवटप्पा ता.पाथर्डी, जि.प.प्राथमिक शाळा चिंचपुर इजदे ता. पाथर्डी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरी (ता.पाथर्डी) या विद्यालयाचे दाखले व बनावट शिक्के व साहित्य आढळून आले.पोलिसांनी या दोघांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आपल्या साथीदाराची नावे सांगितली.साथीदार कुंडलिक दगडू जायभाय (रा. अनपटवाडी ता.पाटोदा जि.बीड), मच्छिंद्र कदम (रा.मानूर जि.बीड),अजय उर्फ जय राजाराम टिळे (रा.वाडीवरे ता.इगतपुरी जि.नाशिक) व शांताराम पंढरीनाथ अनार्थे (रा.पिंपळगाव जि. नाशिक) यांची नावे पुढे आली असून या चौघांवर गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस कॉन्स्टेबल विनोद शिवाजी मासाळकर यांनी या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला.या कारवाईत अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, गुन्हे अन्वेषण विभागातील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस उपनिरीक्षक संजय डांगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, मनोहर चव्हाण, प्रकाश वाघ, सागर ससाणे यांनी सहभाग घेतला. या घटनेचा तपास पो. निरी. सुहास चव्हाण हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा