Subscribe Us

header ads

दीवाळी पूर्व सातवा वेतन आयोगाची थकबाकीचा दुसरा हप्ता द्यावा - माधव सौंदरमल

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी/दि.१० शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना दिलेल्या निवेदनात माधव  सौंदरमल यांनी म्हटले आहे की ,माहे जुलै च्या निवृत्ती वेतनामध्ये वेतन आयोगाच्या थकबाकी चा दुसरा हप्ता देण्याचे शासनाचे आदेश होते.निवृत्तीवेतन धारकांना माहे जुलै २०२१ निवृत्तीवेतन बरोबर सदरील वेतन आयोगाचा दुसरा हप्ता देणे आवश्यक होते. सदरील वेतन आयोगाच्या दुसऱ्या हप्त्याच बिल शाळेने पेयुनिट दाखल केलेले आहे. बऱ्याच विभागातील कर्मचाऱ्यांना व डी. सी.पी .एस धारकांना दुसरा हप्ता मिळाला आहे. परंतु संस्थेच्या कर्मचाऱ्याला सदरील हप्ता  मिळालेला नाही. निवृत्तीवेतनधारकांना हप्ता देणे आवश्यक असतानाही बजेट नाही. या कारणाखाली टाळाटाळ लावलेली आहे. मला शुगर व बीपी आणि मणक्याचा आजार आहे . औषधोपचारासाठी पैसा नाही, बरेच निवृत्ती कर्मचारी अडचणीत आहेत. सदर निवृत्तीवेतन धारक हे साठ वर्ष व त्यापुढील व्हायचे आहेत. काही निवृत्ती वेतनधारक मरणा अवस्थेत पर्यंत पोचलेले आहेत. तरी शासनाने त्यांना दुसरा हप्ता दिला नाही. तो त्वरित द्यावा यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड यांना  माधव   सौंदरमल यांनी वेतन आयोगाची थकबाकी चा दुसरा त्याची रक्कम निवृत्तीवेतन धारकांना त्वरित द्यावा. अशी मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा