Subscribe Us

header ads

बांगरवाडी साठवण तलावाची दुरूस्ती रखडल्याच्या निषेधार्थ डुबकी आंदोलन तात्काळ दुरूस्तीची मागणी-- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

पाटोदा_पाटोदा तालुक्यातील मौजे बांगरवाडी येथिल साठवण तलावाच्या सांडव्याला वर्षभरापासुन मोठे भगदाड पडले असुन त्यामुळे सध्या तलाव तुडुंब भरून वाहत असल्याने भविष्यात अपघात घडुन शेतीचे नुकसान तसेच तलावा खालील गावातील लोकांची जिवित अथवा वित्तहानी होऊ शकते त्यामुळेच संबधित प्रकरणात तलावाच्या दुरूस्तीसाठी विलंब करणा-या व विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची अवमानना केल्याबद्दल संबधित जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी आणि तात्काळ तलावाची दुरूस्ती करण्यात यावी यासाठी आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली भगदाड पडलेल्या सांडव्याच्या भिंती ठिकाणी “डुबकी आंदोलन “करण्यात आले .पाटोदा तालुक्यातील मौजे बांगरवाडी साठवण तलावाच्या सांडव्याला (संरक्षक)भिंतीला 8 फुट रूंद व 4 फुट खोल आकाराचे भगदाड पडले असुन त्यातुन आपोआपच दगड निखळत आहेत, पावसाळ्यात तलाव तुडुंब भरून वाहु लागल्यानंतर तलावाच्या खालील गावातील लोकांचे दुर्दैवाने अपघात होऊन पिकांचे, शेतीचे तसेच जिवित व वित्तहानी होऊ शकते तसेच उन्हाळ्यात पाण्याची गळती होऊन या साठवण तलावावर अवलंबुन असणा-या गावांमध्ये तसेच अर्ध्या पाटोदा शहराला तिव्र पाणीटंचाई सामोरे जाऊ लागु नये म्हणून वर्षभरापासुन शासन दरबारी निवेदन, आंदोलनानंतर सुद्धा अद्याप कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही.

आ.बाळासाहेब आजबेंना वर्षबरापुर्वी बांगरवाडी साठवण तलाव दुरूस्तीच्या आश्वासनाचा विसर पडला


वर्षभरापुर्वी बांगरवाडी साठवण तलावातील सांडव्याच्या भिंतीला भगदाड पडल्या प्रकरणात आ. बाळासाहेब आजबे यांनी मृद व जलसंधारण उपविभाग पाटोदा आधिका-यांसमवेत घटनास्थळाची गेल्यावर्षी 24 ऑगस्ट 2020 रोजी पाहणी करून तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, तसेच कामात हलगर्जीपणा करणारांची गय केली जाणार नाही असे सांगुन सुद्धा अद्याप दुरूस्ती करण्यात आलीच नाही. त्यामुळेच आ.बाळासाहेब आजबे यांना तलावाच्या दुरूस्तीचा वर्षभरापुर्वी दिलेल्या आश्वसनांचा विसर पडल्याची चर्चा होत आहे.

विभागीय आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली,दुरूस्ती नाहीच


सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या तक्रारीवरून विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद (रोजगार हमी योजना शाखा)उप आयुक्त (रोहयो)औरंगाबाद यांनी वरील प्रकरणात जिल्हाधिकारी बीड यांना आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी बीड यांनी उपविभागीय आधिकारी पाटोदा यांना आदेश देऊन सुद्धा अद्याप दुरूस्ती करण्यात आलीच नाही.

आंदोलनात सहभागी

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखालील” डुबकी आंदोलनात लक्ष्मण सस्ते ,अध्यक्ष विश्व वारकरी संघटना, बंडोपंत काळे,पोपट काळे , सुरेश सस्ते, बारीकराव काळे. भाऊसाहेब काळे, कृष्णा तांबारे ,गणेश काळे ,तुकाराम सस्ते, उत्तम काळे,पांडुरंग रूपनर, देविदास काळे .आदिंनी सहभाग घेतला. निवेदन जलसंधारण आधिकारी ठोंबरे एस. एच., उप अभियंता मृद व जलसंधारण उपविभाग पाटोदा उदमले के. एन.,पीएसआय पठाण ए.पी.,गोपनीय शाखा पोलिस्ट नाईक काथखडे बी. के.,हेड काॅन्सटेबल नैराळे, पोलीसनाईक सुनिल सोनावणे, पोलीस काॅन्सटेबल खरसाडे, यांना देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा