Subscribe Us

header ads

जन्मदात्या बापाकडून मुलाचा गळा आवळून खून;फरार आरोपी तीन तासात अटक

नेकनुर_नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खडकीघाट येथील एका वस्तीवर एका पत्र्याच्या शेड मध्ये एका १३ वर्षीय मूलाचा मृतदेह आढळून आला आहे. हि घटना आज बुधवार रोजी घडली असुन घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी सहकार्यसह घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेऊन तिचे निरीक्षण केले असता मुलाचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले हा खुन कुटुंबीयांतीलच कोणी तरी केला असावा असा संशय झाल्याने सदरील मुलाच्या बापानेच खून केला असावा कारण तो घटनास्थळी हजर नव्हता स. पो. नि. मुस्तफा शेख यांनी तपासाची चक्रे फिरवली व आरोपीला पाटोदा येथून ३ तासात अटक केले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.राकेश उमेश वाघमारे वय १३ वर्षे असे मृत मुलाचे नाव असून त्याचा मृतदेह बीड तालुक्यातील खडकीघाट येथील खोखडोह वस्तीवरील शेतातील एका पत्र्याच्या शेड मध्ये बुधवारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाचे निरीक्षण केले असता मुलाचा खून गळा आवळून केला असल्याचा त्यांच्या निदर्शनास आले असता हा कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीने केला असावा असा संशय त्यांना आणि त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवली असता मुलाचा बाप उमेश वाघमारे हा तेथे नव्हता थोडा ही विलंब न करता पोलिसांचे एक पथक त्या मध्ये पो. कां. घोलप, नवले, खांडेकर, जायभाय, डोंगरे, नागरगोजे, यांना अहमदनगरच्या दिशेने पाठवले असता या पथकाने पाटोदा बस स्थानक येथे सापळा रचून आरोपीला अटक केली तिच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाची पाहणी करून काही मिनिटांत हा गुन्हा उघडकीस आला व अवघ्या तीन तासात आरोपी अटक करण्यात आल्याने स. पो. नि. मुस्तफा शेख व त्यांच्या पथकाचे कौतुक होत आहे. बापानेच मुलाच्या खुन का व कशासाठी केला याचा अधिक तपास नेकनुर पोलीस करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा