Subscribe Us

header ads

लोकशाहीला बळकट करण्यासाठी नवीन मतदारांनी मतदान यादीत नाव समाविष्ट करा-- जिल्हाध्यक्ष बाप्पासाहेब भांगे


वडवणी (प्रतिनिधी) लोकशाहीने दिलेल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी नवीन मतदारांनी ३० सप्टेंबर २०२१ पूर्वी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग यांना संपर्क साधावा असे आवाहन आझाद हिंद संघटनेचे जिल्हाध्यक्ष/पत्रकार/ बप्पासाहेब भांगे यांनी केले आहे.जानेवारी 2021 ला आपले वय १८ वर्ष झाले. त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून व नगरपालिका निवडणूक आयोगामार्फत नवीन मतदार यादीत नाव नोंदणी करावी जेणेकरून आपल्याला मतदानाचा हक्क बजावता येईल.येत्या काही महिन्यात नगरपालिका निवडणूक येत आहे त्या पार्श्वभूमीवर नवीन मतदारांना आपल्या आवश्यक त्या कागदपत्रासह तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाशी संपर्क साधावा.तरी बीड जिल्हा हा ऊसतोडणी मजुरांचा जिल्हा ओळखला जातो या ऊसतोडणी मजुरांच्या सर्व 18 वर्ष वयोगटातील मुलांनी आपले मतदान यातील नाव नोंदवा.वडवणी येथील तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच नवीन मतदारांनी फॉर्म क्रमांक ६ भरून आवश्य त्या कागदपत्रांची प्रत ची पूर्तता  करावी बीडजिल्हा मधील वडवणी तालुक्यातील  सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्या असे आव्हान आझाद हिंद संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पत्रकार बप्पासाहेब भांगे यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा