Subscribe Us

header ads

डॉ शहाजी चंदनशिवे यांना बेटी फाउंडेशनचा आंतरराष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी परंडा/ दिनांक 15 सप्टेंबर 2021 परंडा येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाचे प्राध्यापक डॉ शहाजी  शिवाजी चंदनशिवे यांना बेटी फाउंडेशन वनी जिल्हा यवतमाळ या सामाजिक संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे . सदर पुरस्कार येत्या 26 सप्टेंबर 20 21 रोजी प्रिन्स लॉन्स वनी जिल्हा यवतमाळ येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी, मेडल, सन्मानपत्र ,मानवस्त्र आणि बॅच असे असणार आहे .डॉ शहाजी चंदनशिवे यांना शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्यामुळे जिल्हास्तरीय पासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ते जिल्हा ,विभाग आणि राज्य स्तरावर विविध समित्या वर विविध संघटनेवर मुख्य पदावर कार्यरत आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर झाल्यामुळे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा वर्षाताई गायकवाड आणि त्यांचे सचिव सुनील चंदनशिवे, अल्पसंख्यांक विभागाचे अवर सचिव एजाज अहमद ,जलसंधारण विभागाचे अवर सचिव अंबादास चंदनशिवे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ वायदंडे ,मुंबई पोलिस विभागाचे एटीएस संतोष पैलकर, उस्मानाबाद जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, लातूर विभागाचे सहसंचालक डॉ गजानन मोरे ,माजी शिक्षणाधिकारी शिवाजी चंदनशिवे, श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, अध्यक्ष सुनील शिंदे ,शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ दीपा सावळे, गुरुवर्य प्राचार्य डॉ अशोक दादा मोहेकर, राजश्री शाहू महाविद्यालय लातूर येथील प्राचार्य डॉ महादेव गव्हाणे , डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या अनेक महाविद्यालयातील प्राध्यापक ,सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे ,स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ नांदेड ,मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर  आणि राज्यातील मित्र परिवारांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा