Subscribe Us

header ads

आयपीएल सामन्यांसाठी मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश राहणार

नवी दिल्ली/ येत्या रविवारी आयपीएलच्या दुसऱ्या टप्याला सुरुवात होणार आहे, स्पर्धेचे सामने अमिराती होणार असून , या सामन्यासाठी मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश मिळणार आहे. याआधी कोरोना वाढल्याने मे महिन्यात स्पर्धा थांबविण्यात आली होती. नंतर दुसरा टप्पा अमिराती येथे घेण्याचे निश्चित झाले होते.त्यानुसार हा टप्पा रविवारपासून सुरू होत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर होईल.या सामन्याने दुबईत क्रिकेटच्या सामन्यांसाठी प्रेक्षक प्रेक्षक पुन्हा मैदानात उपस्थिती लावणार आहेत. अर्थात, कोविड 19 चा धोका लक्षात घेता प्रेक्षकांच्या संख्येवर मर्यादा असेल.सामने दुबई, शारजा आणि अबु धाबी येथे होणार आहेत. यामुळे 2019 नंतर आयपीएलचे सामने प्रथमच प्रेक्षकांच्या उपस्थितीत होतील. गेल्यावर्षी येथेच झालेली आयपीएल आणि या वर्षीचा भारतातील टप्पा हा प्रेक्षकांशिवायच पार पडला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा