Subscribe Us

header ads

महाराष्ट्र सरकारचे आरोग्य खाते आजारी, गलथान धोरणांचा लाखो बेरोजगारांना फटका !!!डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

अकोला दि. २४ - महाराष्ट्र सरकारचे आरोग्य खाते व्हेंटिलेटरवर असून ह्या आजारी पडलेल्या विभागाच्या गलथान धोरणांचा लाखो बेरोजगारांना फटका सहन करावा लागत असून राज्यात परिक्षा असलेल्या परिक्षार्थींना उत्तर प्रदेशात परिक्षा केंद्र देण्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून सरकारने ह्यात दुरूस्ती न केल्यास वंचित बहुजन आघाडी आंदोलन करणार असल्याचा इशारा वंचित बहूजन आघाडीचे नेते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर प्रदेश उपाध्यक्ष यांच्या वतीने देण्यात आला.सध्या महाविकास आघाडीचे राज्य सरकारचे आरोग्य खाते बिघडले आहे. त्याची अवस्था व्हेंटिलेटरवर असलेल्या रूग्णापेक्षा वाईट बनली आहे. आरोग्य विभागातील पद भरतीची परिक्षा महाराष्ट्रात उद्या २५ सप्टेंबर रोजी होऊ घातली आहे. अनेक बेरोजगार युवक युवतीने सदर परिक्षेकरिता अर्ज भरले पण अनेक लोकांना सदर परिक्षेकरिता परिक्षा केंद्र उत्तर प्रदेशात दिले असून त्यामुळे अगणित परिक्षार्थी परिक्षे पासून वंचित राहणार आहे. असेच गलथान धोरण राहिले तर परिक्षार्थीच्या मुलाखती परदेशात घेण्याचा उफराटा प्रकार आरोग्य खाते करू शकते, असे दिसते. बेरोजगार युवक युवतीची क्रूर थट्टा सरकारने केली असून वंचित बहुजन आघाडी याचा तीव्र निषेध करत आहे. महाविकास आघाडीने सदर परिक्षा रद्द करून नव्याने प्रवेश पत्र द्यावे आणि स्थानिक केंद्रावर परिक्षा घ्यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी न्यायालयात आणि रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा चित बहुजन आघाडी तर्फे देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा