Subscribe Us

header ads

कागदंसुद्धा अनाथ झाली!दिलीप भोसले गेले.. निराधारांचा आत्मा हरवला!!

  संपादकीय 
🌀🌀🌀🌀

बीड प्रतिनिधी/ राजकारणात शब्दाला अजिबात महत्व नसतं शब्दाला जगणारी माणसं राजकारणात टिकतदेखील नाहीत. पण दिलीप भोसले अपवाद होते. सच्चा माणूस होता. फुकाचा दिखाऊपणा अजिबात नव्हता. गेल्या महिन्यात एवढं मराठवाडा पातळीचं पद मिळालं, तेही सत्ताधारी पक्षाचं. पण कसलाच डामडौल नाही की मिरवामिरवी नाही. उपेक्षित, निराधार आणि अनाथ लोकांसाठी या माणसाने आयुष्य वेचलं. 'संजय गांधी निराधार'सारखी छोटी तालुका समिती; पण या माणसाने कामाचा ठसा उमटवला. कित्येक निराधार पोटाला लावले. म्हणूनच आज खऱ्या अर्थाने निराधार अनाथ झाल्याच्या भावना आहेत. शिवसेनेच्या अंगणवाडी सेनेचं मराठवाड्याचं अध्यक्षपद गेल्या महिन्यात मिळालं होतं. त्यानिमित्ताने त्या पदालाच न्याय मिळाल्याच्या भावना होत्या. ते आता मोठं काहीतरी करतील, असं वाटत होतं. पण दुर्दैव! एखाद्या कुटुंबात एकसारखे योगायोग घडतात. तसंच भोसले कुटुंबात झालं. काही वर्षांपूर्वी मुलगी गेली, चार महिन्यांपूर्वी पत्नी गेली आणि आता स्वतः...शुक्रवारी रात्री हा कार अपघात झाला. छायाचित्रात गाडीच्या मागच्या सीटवर जी कागदं दिसतायत त्याने कुणा निराधाराला न्याय मिळाला असता... पण तीसुद्धा आज पोरखी झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा