बीड प्रतिनिधी / बीड शहरात अनेक ठिकाणी महिला स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलावर्गाची होत आहे अडचण, तात्काळ महिलांसाठी सुलभ स्वच्छालय स्वच्छतागृहे तयार करून होणारी कुचंबणा थांबवावी अशी मागणी एका पत्रकाद्वारे सुरेखा जाधव यांनी केली आहे.बीड शहरात,भाजी मंडई, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, सुभाष रोड, मार्केट, नगर रोड वरती पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह आहे. परंतु महिलांसाठी नगरपालिकेने व त्यांच्या अध्यक्ष व नगरसेवकांनी स्वतंत्र महिला स्वच्छतागृह याकडे दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे कामा निमित्त बाहेर असणाऱ्या महिलांची मानसिक कुचंबणा होत आहे. नगर रोड , कॅनल रोड,वर अनेक शासकीय कार्यालय आहेत तेसील, जिल्हा सत्र न्यायालय , सामाजिक न्याय भवन, ग्रामीण भागातून अनेक महिला वर्ग कामानिमित्त शहरात असल्यामुळे त्या महिलांच्या समस्या कडे दुर्लक्ष केले जात आहे महिलाही या समाजाचा ५० टक्के भाग आहे, महिलाही जगत्जननी आहे मग तिच्या अडचणीकडे दुर्लक्ष का ? त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर महिलांसाठी स्वच्छता गृहचे सर्वजनिक ठिकाणी बांधकाम सुरू करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेखा जाधव यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे .
0 टिप्पण्या