Subscribe Us

header ads

पतीने केला पत्नीचा गळा आवळून खून


बीड -: चारित्र्यावरील  संशय व कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना शहरातील मासूम कॉलनीत 11  सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता उघडकीस आली.  यादरम्यान पत्नीचा खून केल्यानंतर पतीने घराला कुलूप लावले व थेट पोलिस ठाणे गाठले.या थरारक घटनेने शहरात खळबळ उडाली. शेख मालिका शेख याकूब(वय 38) असे मृत विवाहितेचे नाव आहे. शेख याकुब शेख खुदबुद्दीन याने  मलिकाशी आठ वर्षीपूर्वी प्रेमविवाह केला होता. मलिकाचे माहेर माजलगाव आहे. दरम्यान याकूब ला तीन भाऊ आहेत. प्रेमविवाह नंतर काही वर्षातच तो पत्नीसह मासूम कॉलनी या भागात राहायला गेला.तो मिस्त्रीकडे बिगारी काम करायचातर पत्नी घर काम करायची. त्यांना तीन मुले आहेत. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे पती-पत्नीत सतत वाद होत होता.11 सप्टेंबर रोजी रात्री साडे आठ च्या दरम्यान मुले घराबाहेर खेळत होते.या दरम्यान या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यात  याकूब ने आधी मलिकाचा गळा आवळला. त्यानंतर बेशुद्ध झालेल्या मलिकाचे तोंड ऊशीच्या साहाय्याने दाबले. यात तिचा  मृत्यू झाला. दरम्यान पत्नीचा खून केल्यानंतर घराला कुलूप लावून  याकूब थेट पेठ बीड पोलिस ठाण्यात पोहोचला. त्यांने पोलिसांना आपण
पत्नीचा खून केल्याची माहिती दिली.यानंतर पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक गंगाधर दराडे, राजेंद्र बनकर हे घटनास्थळी दाखल झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा