Subscribe Us

header ads

तांदळवाडी राशन धान्य घोटाळा; जलसमाधी आंदोलन सुरू

बीड_ बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थे सोबतच प्रशासकिय व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सामाजिक न्यायाचे तीन तेरा वाजले आहेत.राशनचा काळ्या बाजारात जाणारे धान्य पकडून दिले,रास्ता रोको केला तरी आमदार व पालकमंत्री वमने व पकडलेल्या आरोपींना पाठीची घालत असल्याने संतप्त तांदळवाडीकरांनी जलसमाधी आंदोलन सुरू करत पालकमंत्र्यांच करायचं काय? खाली मुंडकं…., बीडचा आमदार हाय हाय ? जिल्हाधिकाऱ्यांच करायचं काय… यासारख्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला आहे.जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असतानाच. भ्रष्टाचाऱ्यांंना मोठ्या प्रमाणात राजकीय पाठबळ देत पालकमंत्री, बीड चे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून पाठबळ दिले जात असल्याचा आरोप जनतेतून होऊ लागल्यामूळे सामाजिक न्यायाची घडी विस्कटून गेली आहे. गोरगरिबांचे धान्य काळ्याबाजारात विक्री केले जात आहे. काळ्याबाजारात जाणारे धान्य पकडून दिले तरी त्यावर कारवाई होत नाही.वमनेसारखा भ्रष्टाचाराने बरबटलेला अधिकारी या प्रकरणाकडे लक्ष देत नाही. प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावत. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला देखील आपल्या दावणीला बांधण्याचे काम करतो. जिल्हाधिकाऱ्यां सारखा सज्जन माणूस देखील धृतराष्ट्रा सारखी भूमिका घेऊन गप्प बसतो. या सर्व खेळाला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर खतपाणी घालत काळ्याबाजारात राशन धान्य घेऊन जाताना पकडलेल्या आरोपींना व वमने सारख्या अधिकाऱ्याला पाठीशी घालतात. एवढेच नाही तर दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देऊन देखील याकडे डोळेझाक केली गेली. परिणामी आज तांदळवाडी च्या संतप्त ग्रामस्थांनी तलावात उतरून आपल्या न्याय हक्कासाठी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. यावेळी छातीइतक्या पाण्यात उतरलेल्या ग्रामस्थांनी पालकमंत्री धनंजय मुंडे, आ.संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी शर्मा व पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्या विरोधात घोषणा देत आपला संताप व्यक्त करू लागले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा