Subscribe Us

header ads

शहेबाज खान खून प्रकरणी तिघांना जन्मठेप चौघांची निर्दोष मुक्तता बीड न्यायालयाचा निकाल



बीड_  बीड शहरातील कारंजा परिसरात सन 2017  मध्ये झालेल्या शहेबाज खान (बिल्डर) यांच्या खून प्रकरणात तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली या प्रकरणातील अन्य चौघांची निर्दोष मुक्तता झाली आहे. 
बीड शहरातील कारंजा परिसरात दि.17 मे 2017  रोजी शहेबाज खान दलमीर खान (बिल्डर) यांचा खून  करण्यात आला होता. या प्रकरणात सात जणांविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पो.नि  सय्यद सुलेमान यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणात बीड येथील दुसरे जिल्हा सत्र न्यायालयात आज झालेल्या सुनावणीमध्ये तिघांना दोषी ठरविण्यात आले. न्यायालयाने अरबाज खान फेरोज खान उर्फ कालू, समद खान युसूफ खान, फेरोज खान युसुफ खान उर्फ राजू, या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि जुबेर खान समद खान, सुमेर  खान समद खान, अफरोज खान फेरोज खान, वाजेद खान समद खान, या चौघांची निर्दोष मुक्तता केली.सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे एडवोकेट  अजय राख यांनी काम पाहिले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा