Subscribe Us

header ads

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रियकराचा प्रेयसीकडून खून

पुणे_हडपसर परिसरात लिव्ह इन रिलेशनशिप राहणार्‍या जोडप्यामध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणामध्ये प्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयत प्रियकर सोनल पुरुषोत्तम दाभाडे (३४) आणि आरोपी तरुणी रोहिणी रामदास युनाते (२४) अशी दोघांची नावे आहेत. तर प्रेयसीला याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी करताना झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर हे दोघे तरुण तरुणी लिव्ह इन रिलेशनशिप राहत होते. दोघांमध्ये किरकोळ कारवारून वाद होत असल्याने तरुणीने रागाच्या भरात तरुणाचा खून केला. हडपसरमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलीसांच्या तपासानंतर आणि शवविच्छेदनानंतर तरुणीने हा खून केल्याचे उघड झाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सोनल हा मुळचा अमरावतीमधील आहे. तर रोहिणी ही बीड येथील आहे. त्या दोघांची ओळख स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने झाली होती आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही काळाने दोघे ही फुरसुंगी भागात एकत्रित राहण्यासाठी आले होते. मात्र त्या दोघांमध्ये मागील काही दिवसात क्षुल्लक कारणावरून वाद होत असत. वादाचे रुपांतर भांडणात होऊ लागलं. २९ ऑगस्ट रोजी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यावेळी रोहिणीने सोनलला भिंतीवर ढकलून दिले. त्यात सोनलच्या डोक्याला जबर मार बसला. त्यानंतर रोहिणीने सोनलचा गळा दाबून खून केला. या घटनेनंतर आरोपी रोहिणीला अटक करण्यात आल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा