Subscribe Us

header ads

रा गे शिंदे महाविद्यालयातील प्रा डॉ सचिन चव्हाण यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता


प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे 
 
परंडा -  दिनांक 3 सप्टेंबर 2021 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ सचिन चव्हाण यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाने पीएचडीचे संशोधन मार्गदर्शक म्हणून नुकतीच मान्यता दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मान्यताप्राप्त पत्र डॉ सचिन चव्हाण यांना प्राप्त झाले आहे. डॉ सचिन चव्हाण यांना पीएचडीचे संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाल्यामुळे श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे ,आई क्यू ए सी चे चेअरमन डॉ महेशकुमार माने ,स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे, वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रकाश सरवदे कार्यालयीन अधिक्षक भाऊसाहेब दिवाने तसेच महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले डॉ सचिन चव्हाण यांना विद्यापीठाने 4 संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा