Subscribe Us

header ads

आपेगाव मध्ये एनडीआरएफच्या टिमने १८ जणांना सुखरूप बाहेर काढले


अंबाजोगाई_ अंबाजोगाई तालुक्यात आपेगाव येथे मांजरा धरणाचे पाणी शिरल्याने अर्धे गाव पाण्यात सापडले होते,या गावात आज एनडीआरएफची तुकडी दाखल झाली असून आता पर्यंत सकल भागात अडकून पडलेल्या तब्बल 18 जणांना सूखरूप बाहेर काढल्याने गावकरी वर्गाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.एनडीआरएफचे पथक आपेगावमध्ये दाखल झाल्याने बचाव कार्याला वेग आला आहे.एनडीआरएफच्या जवानासोबत आपेगाव येथील शाळेचे मुख्याध्यापक कचरू रंजवे ,सहशिक्षक निलेश शिंदे आदींनी शोधकार्यात मदतीला धावून आले होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा