Subscribe Us

header ads

कार व मोटारसायकलच्या धडकेत एक ठार दोन जखमी

माजलगाव-:मोटारसायकल व कारच्या समोरा समोर झालेल्या धडकेत एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना माजलगाव परभणी रोडवर गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात गणेश वसंत डांगे वय 18 वर्षे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वसंत डांगे वय 42 वर्ष, अविनाश डांगे वय 14 वर्ष एक गंभीर जखमी झाले आहे. हे तिघे बापलेक कामानिमित्त माजलगाव येथे आले होते. कामकाज आटोपल्यानंतर रोशनपूरीला मोटारसायकल वरून जात असताना परभणी रोडवर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ कार क्रमांक एम एच 14,इएम 92 व मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. यात गणेशचा जागीच मृत्यू झाला. तसेच जखमी झालेल्या वसंत डांगे व अविनाश या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा