Subscribe Us

header ads

बीड जिल्ह्यातुन जाणाऱ्या अहमदपूर-पिंपळा-मांजरसुंभा चुंबळी फाटा मार्गासह अन्य रखडलेली कामे सहा महिन्यांच्या आत पूर्ण करा - ना. धनंजय मुंडे, ना. संजय बनसोडे यांचे संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना निर्देश

एमएसआरडीसी कडील रस्त्यांच्या कामांबाबत महत्वपूर्ण बैठक संपन्न; कामातील दिरंगाई बद्दल अधिकारी फैलावर



मुंबई (दि. 03) ---- : बीड जिल्ह्यातील अहमदपूर ते पिंपळा, पिंपळा ते मांजरसुंबा, मांजरसुंबा ते चुंबळी, लातूर जिल्ह्यातील जाहिराबाद ते लातूर आणि आष्टा मोड ते उदगीर, माजलगाव ते केज, केज ते कुसळंब या रस्त्यांची संथ गतीने चाललेली कामे सहा महिन्यांच्या आत पूर्ण करावीत असे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम ) राज्यमंत्री ना. संजय बनसोडे व यांच्या संयुक्त बैठकीत देण्यात आले.अधिकारी व ठेकेदार यांना या कामात होत असलेल्या दिरंगाईबद्दल चांगलेच फैलावर घेऊन सदरील रस्ते सहा महिन्यांच्या आत पूर्ण करावा अन्यथा संबंधित ठेकेदारावर कारवाई प्रस्तावित करावी अशा सूचना ना. मुंडेंनी ना. बनसोडे यांना केल्या असता, संबंधित कंत्राटदारांनी निर्धारित वेळेत काम पूर्ण न केल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल अशा सक्तीच्या सूचना दिल्या आहेत.बुधवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी ही बैठक संपन्न झाली; या बैठकीस ना. धनंजय मुंडे, ना. संजय बनसोडे, आ. संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांसह एम एस आर डी सीचे प्रमुख अधिकारी व संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.बीड जिल्ह्यातील महत्वाचा अहमदपूर-पिंपळा-मांजरसुंबा-चुंबळी हा रस्ता 70% पेक्षा अधिक पूर्ण झाला असून उर्वरित कामे अर्धवट असल्याने वाहतुकीस अडथळे येत आहेत. त्यामुळे सहा महिन्यांच्या आत हे काम पूर्ण केले जावे अशा सक्तीच्या सूचना संबंधितांना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा