Subscribe Us

header ads

शेळ्या संभाळ करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर नराधमाने बळजबरीने केला अत्याचार



केज-: तालुक्‍यात शेळ्या सांभाळणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने बळजबरीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी गरोदर राहिल्याचे कळतच तिला विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक व माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. तो नराधम हा पीडित मुलीच्या भावकितील असून  नात्याने चुलत भाऊ आहे.याबाबतची माहिती अशी की केज तालुक्यातील एका गावात शेळ्या सांभाळणाऱ्या (16)  वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या भावकितील नात्याने चुलत भाऊ असलेल्या नराधमाने तीन महिन्यांपूर्वी एका शिवारात बळजबरीने अत्याचार केला. यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली याची माहिती नराधमाना होतच तिला जीवे मारण्याचे उद्देशाने विहिरीत ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याची माहिती अल्पवयीन मुलीने तिच्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठून दि.2 सप्टेंबर रोजी केज पोलिस ठाण्यात त्या नराधमाच्या विरुद्ध फिर्याद दिली त्या नुसार दि.2 सप्टेंबर रोजी त्याच्याविरुद्ध गु र नं /2021 भा दं वि 376 (2) (टि) (एन)307 यासह बाललेंगिक अत्याचार कायदा 2012 चे कलम 4,6,8,10,नुसार अत्याचार करून खून करण्याचा प्रयत्न करणे व बाललैंगिक अपराध पासून बालकांचे संरक्षण म्हणजे पॉक्सो नुसार गुन्हा दाखल झाला आहे. परभणी ठाणे अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी गुन्हा दाखल करून  प्रभारी ठाणे प्रमुख शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी व पिंक पथकाच्या रुक्मणी पाचपिंडे हे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा