Subscribe Us

header ads

सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त बोधिसत्व प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप


परळी प्रतिनिधी/दि. 17 बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विश्वरत्न बुद्ध विहार मांडेखेल ता परळी येथे बोधिसत्व प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु हणुमंत बनसोडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बोधिसत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन रणखांबे, जेष्ठ मार्गदर्शक आयु अर्जुन चोपडे, बालाजी बनसोडे, भारत साळवे, वाल्मीक साळवे आदि मान्यवर उपस्थित होते.तथागत गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प आणि पुष्पहार अर्पण करून सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण केल्यानंतर.वर्षावास काळात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथांचे वाचन चि जयदीप वाव्हळे या बालकाने केल्यानंतर त्यासंदर्भात सचिन रणखांबे यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म व सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जिवनतातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले, अर्जुन चोपडे यांनी मांडेखेल येथे सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल बौद्ध बांधवांचे कौतुक केले.भिमशाहिर वाल्मीक साळवे यांनी त्रिसरण पंचशीलेचे सुर जुळाले,भिमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले ‌‌हे गीत सादर केले.अध्यक्षीय मनोगतात हणुमंत बनसोडे यांनी सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उजाळा दिला.कार्यक्रमाच्या शेवटी बोधिसत्व प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्याचे,(वही पेन)वाटप बोधिसत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन रणखांबे,अर्जुन चोपडे, हणुमंत बनसोडे, बालाजी बनसोडे, भारत साळवे, वाल्मीक साळवे, महादेव वाव्हळे,प्रा धनंजय वाव्हळे अविनाश वाव्हळे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महादेव वाव्हळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.धनंजय वाव्हळे यांनी केले कार्यक्रमास महिला,पुरुष आणि बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरतण घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमात उपस्थित असणारे, राधाकिसन वाव्हळे नितीन वाव्हळे ,प्रताप(बंधू)वाव्हळे मिलिंद वाव्हळे अरुण  वाव्हळे,संजय वाव्हळे निखिल वाव्हळे  अवि (दादा)  वाव्हळे,सुनील वाव्हळे, हनुमंत वाव्हळे, अमर (बंटी) वाव्हळे,अक्षय वाव्हळे,किशोर वाव्हळे चंद्रशेखर,वाव्हळे अमर (भैय्या)वाव्हळे ,सतीश वाव्हळे,विद्या राधाकिसन वाव्हळे,भिमाबाई मुरलीधर वाव्हळे,वंदना चत्रभुज  वाव्हळे घाडगे किशोरी रमाबाई अंबादास वाव्हळे  यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा