Subscribe Us

header ads

तरूणाच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक ; मृतदेह महामार्गावर ठेवून मांडला ठिय्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, तणावपूर्ण वातावरण ; महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा संबंधित विभागाचे अधिकारी तसेच जबाबदार प्रशासकीय अधिकारी दाखल न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक

गेवराई ( दि, २६ प्रतिनिधी ):- गेवराई तालुक्यातील भोजगाव  येथील अमृता नदीवरील  वाहुन गेलेल्या पुलाने आणखी एक बळी घेतला आहे.पुलावरून सावडण्याच्या कार्यक्रमाला जात असताना पाण्यात पडुन सुदर्शन संत या तरुणाचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. तर ज्या मयत मुलीच्या सवडण्याच्या कार्यक्रमाला तो जात होता. त्या मयत मुलीचा मृतदेह देखील दोन दिवसांपूर्वी वडिलांना आपल्या खांद्यावर घेऊन जावा लागला होता.तर या नेहमी होणाऱ्या दुर्घटनेमुळं ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी रस्त्यावर मृतदेह ठेवून रस्ता रोको करत लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा निषेध केला.गेल्या काही वर्षांपासून भोजगावला जोडणारा अमृता नदीवरील पुल वाहून गेला आहे. याआधी देखील वाहुन जाण्याच्या घटना घडलेल्या असुन आज परत ही घटना घडली आहे.त्यामुळे निगरगट्ट लोकप्रतिनिधी व प्रशासन आणखी किती बळी घेणार ? असा संतप्त सवाल भोजगाव ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. दरम्यान नागरिकांनी मृतदेह गेवराई - शेगाव राज्य महामार्गावर ठेवून महामार्ग बंद केलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा