Subscribe Us

header ads

पिंपळदरा वस्ती येथे बैल पोळा सन उत्साहात साजरा


धारुर/ प्रतिनीधी/ हनुमंत तोंडे/चालु असलेल्या कोरोनाच्या आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी कसाबसा पोळ्याचा सण साजरा केला.सोनिमोहा (पिंपळदरा)येथील ग्रामीण भागातल्या अनेक गावांमध्ये बैल पोळा सन मोठ्या उत्साहात साजरा झाला.या सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून धारुर पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
शेती मशागतीसाठी अलीकडच्या काळात आधुनिक तंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.परिणामी बैलांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.बैलजोडी ऐवजी आता ट्रॅक्टरचा वापर सुरू झाल्याने पारंपरिक बैल जोडी दुर्मिळ होत चालली आहे.बीड जिल्ह्यात दहा-अकरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.  
कोरानाचे सावट घेऊन शेतकऱ्यांनी यंदाचा पोळा सण हा साध्या पद्धतीने साजरा केला आहे. सोनिमोहा (पिंपळदरा) येथील सर्व नागरीकांनी हनुमान मंदीर या मंदिराला वाजत-गाजत पाच फेर्या घेऊन पोळ्या च्या निमित्याने आनंद उत्साहात सन साजरा केला.त्या वेळी गावातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.भास्कर तोंडे,लालासाहेब तोंडे,चिंतामण तोंडे,रामा तोंडे,महादेव तोंडे,बालाजी तोंडे,आसांराम तोंडे,भाऊ तोंडे,सचिन तोंडे,अमरदिप तोंडे,सकाराम तोंडे,अजिंत तोंडे,अशोक तोंडे,दादासाहेब तोंडे,रंविंद्र तोंडे,विशाल तोंडे,पोपट भांगे.आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा