Subscribe Us

header ads

धुमेगाव तलाव फुटण्याच्या मार्गावर

गेवराई-:गेवराई तालुक्यातील शनिवारी रात्री पावसाचे रौद्ररूप पहायला मिळाले. पावसाने हाहाःकार करत जनजीवन विस्कळीत केले आहे. दरम्यान तालुक्यात रात्रीतून बंगालीपिंपळा व शेकटा येथील पाझर तलाव फुटल्याने तलावाखालील जमीनीचे व शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.तर गेवराईजवळील खोपटी तांडा येथील तलावाच्या भिंतीला मोठे भगदाड पडले आहे. याठिकाणी भिंतीतून पाण्याचा मोठा विसर्ग होत आहे. तर गाडेवाडी व धुमेगाव येथील तलावाच्या भिंतीला देखील तडे गेले असून हे तलाव फुटण्याची भिती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.तरी प्रशासनाने वेळीच लक्ष दिल्यास याठिकाणी होणारे नुकसान टळू शकते. गेवराई तालुक्यात रात्री सर्वदूर अतिवृष्टी झाली. परिणामी नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत, तर छोटे-मोठे तलाव ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत.यामध्ये तालुक्यातील बंगालीपिंपळा व शेकटा येथील पाझर तलाव फुटल्याने शेकडो हेक्टर जमीनीचे नुकसान झाले असून पिके पाण्यात वाहून गेले आहेत. तर आज सकाळी खोपटी तांडा येथील तलावाला देखील मोठे भगदाड पडले आहे.
तसेच गाडेवाडी येथील पाझर तलाव क्र.-2 व धुमेगाव गावाजवळील पाझर तलाव फुटण्याची शक्यता आहे. येथील रात्रीपासून ओसंडून वाहत असून सध्या तलावाच्या भिंतीला तडे गेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा