Subscribe Us

header ads

सुभाष सारडा यांना मोठा धक्का द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर अखेर प्रशासकाची नियुक्ती

बीड_बीडच्या सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या सुभाष सारडा यांना सहकार क्षेत्रातच मोठा धक्का बसला आहे. सारडा यांचे प्राबल्य असलेल्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर अखेर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे.. बीड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावर सुभाष सारडा यांचे वर्चस्व होते.बीड जिल्ह्यातील द्वारकादास नागरी सहकारी बँकेवर अनेक वर्षांपासून सुभाष सारडा यांचे वर्चस्व आहे. मात्र मागच्या काही वर्षात या बँकेसंदर्भाने अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. ऑडिटमध्ये देखील बँकेवर अनेक ताशेरे ओढण्यात आले होते, यासंदर्भाने बँकेची कसून चौकशी करण्यात आली होती.यासर्व पार्श्वभूमीवर अखेर बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांना बँकेवर प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांनी शनिवारीच पदभार  घेतल्याने सुभाष सारडा यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा