Subscribe Us

header ads

बीड येथे महिला उद्योग परिषदेचे आयोजन - सुरेखा जाधव

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔶🔷🔷🔶🔶🔷🔷
बीड प्रतिनिधी_पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने प्रथमच बीड येथे मंगळवारी रोजी सकाळी 12: 15 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभाग्रहात भव्य महिला उद्योग परिषदेचे आयोजन केले आहे. या महिला उद्योग परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी एसबीआय बँकेचे  उद्योग प्रशिक्षण अधिकारी सुरेश बोचकुरे, खादी ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा अधिकारी सतीश खरात, एमआयडीसी येथील अधिकारी बारी साहेब तसेच संपादक व उद्योजक विजयकुमार वाव्हाळ  ,प्रदेश उपाध्यक्ष  पुरोगामी पत्रकार संघ ,प्रल्हाद फड सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. बऱ्याच महिलांना उद्योग व्यवसाय संदर्भात अनेक प्रश्न पडतात. व्यवसाय कसा करावा  ? नेमका उद्योग कोणता करावा ?  एखादा उद्योग चालू केला तर त्याचे मार्केटिंग कुठे व कसे करावे ?कच्चामाल , मशनरी कुठे मिळेल ? असे अनेक प्रश्‍न त्यांना सतत पडतात. त्यांच्या या सर्व प्रश्नाचे उत्तर मंगळवारी होणाऱ्या महिला उद्योग परिषदेमध्ये मिळणार आहे. एम. आय.डी .सि मध्ये प्लॉट कसा मिळवायचा येथे कोणत्या सुविधा व सवलती मिळतात. तसेच खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून कोणकोणते उद्योग व्यवसाय करू शकतो ? काय योजना आहेत ?सबसिडी किती मिळते ? कोणकोणत्या उद्योगाचे प्रशिक्षण एसबीआय बँकेमार्फत विनामूल्य मिळते  ? तसेच तुळजाभवानी इंटरप्राईजेस माध्यमातून मार्केटिंग करण्याची सुवर्णसंधी ती मार्केटिंग कशी करावी त्याचा फायदा आपल्याला मिळणार आहे. याची सविस्तर माहिती या उद्योग परिषदेमध्ये मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने महिलांनी या महिला उद्योग परिषदेचा लाभ घ्यावा. असे आवाहन भागवत वैद्य, तालीब शेख, सुहास सावंत, निर्मळ, मुजमुले, धिवार, शेवाळे आदींनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा